999+ प्रेमात दुःख शायरी मराठी | Sad Shayari Marathi

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही उदास असाल आणि sad shayari marathi शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण आज आम्ही तुमच्यासाठी sad shayri marathi घेऊन आलो आहोत जे तुम्हाला नक्की आवडेल म्हणून sad shayari marathi चा पूर्णपणे आनंद घ्या.

1. Sad Shayari Marathi

तू आजही खूप सुंदर आहेस
पण तुझ्या चेहऱ्यावर ते हसू नाही
जे माझ्यामुळे यायच.

आयुष्यात एकदाच आलीस
पण माझी सगळी Life तुझ्या आठवणीत
Bussy करून गेलीस

रडल्यामुळे कधी कोणी आपलं होत नसत
तसंही जे आपले असतात
ते रडू थोडी देतात.

कुणीतरी मला विचारले
ती कुठे आहे..?
मी हसत उत्तर दिले
माझ्या श्वासात
माझ्या हृदयात
माझ्या हृदयाच्या प्रत्येक¬ ठोक्यात
यावर¬ पुन्हा विचारले गेले
मग ती कुठे नाही..?
मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले
माझ्या नशिबात

कधी येईल ग आपल्या आयुष्यात
असा क्षण
I am waiting

आपली वाटणारी सगळी माणस
आपली नसतात.
कारण वाटण आणि असणं
यात खूप फरक आहे.

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही की
तु गेल्याचे दुःख मला होत नाही.

Life Partner
सुंदर किंवा श्रीमंत नसावा तर
शेवट पर्यंत साथ देणारा असावा

असं ऐकलयं की
श्वास बंद झाल्यावर
सोडून गेलेले पण भेटायला येतात.

2. Sad Shayari Marathi Girl

दगडाचं काळीज असलेल्यावर
प्रेम करण्यापेक्षा
काळजावर दगड ठेवून जगलेलं बर

सगळं संपलं माहित असूनही
सारखा सारखा त्याच गोष्टीचा
विचार करणे म्हणजेच
खरं प्रेम

जाता जाता तो बोलून गेला
मी तुझ्या आयुष्यात नसणं
यातचं तुझं सुःख आहे,
त्याला कधी कळलचं नाही की
त्याच्याशिवाय आयुष्य
हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे.

काळजी करणारी भेटायला
खरंच नशीब लागत.

आठवल तर अश्रु येतात
न आठवल तर मनं छळते
खरच प्रेम काय आहे ते
प्रेमात पड़ल्यावरच कळते.

आता तो नंबर फक्त माझ्या
आठवणीत राहिला आहे
जो आधी रात्रभर माझ्याशी बोलण्यासाठी
Bussy असायचा.

रडू तर येत होत
डोळ्यात मात्र दिसत नव्हत,
चेहरा कोरडा होता
पण मन मात्र भिजत होत,
कारण डोळे पाहणारे
बरेच भेटतात आयुष्यात,
पण मन जाणणारे कमीच असतात.

काही गोष्टी अशा असतात
ज्या काहीही न बोलता
खूप काही सांगून जातात.

काही नाही या शब्दामागे
खूप काही लपलेलं असत.

तुझ्या आठवणीत राहण
खुप सोप ‪झालय रे
पण ‪तुला विसरण खुप कठीण रे

3. Sad Shayari Marathi Love

शुन्यच आहे आयुष्य माझे तु असताना
धरलास का हात सांग तु
मला सोडुनच जायचे असताना.

ती व्यक्ती तुमच्या जवळची असते
जी फक्त तुमच्या आवाजावरून
समजून जाते की
तुम्ही सुखी आहात की दुखी

एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो.
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात.
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

कोणत्या वेळी काय करावं
हे आपण नाही तर
परिस्तिथी ठरवत असते.

फक्त तुझ्यासाठीच
शहाणा बनलो होतो मी,
तुझ्यासाठीच मुर्ख ठरलो होतो,
तुझ्यासाठीच झूरलो होतो मी,
तुझ्यासाठीच तडफडलो होतो,
तुझ्यासाठीच हसलो होतो मी,
तुझ्यासाठीच रडलो होतो,
तुझ्यासाठीच भांडलो होतो मी,
तुझ्यासाठीच मानलो होतो,
तुझ्यासाठीच घडलो होतो मी,
तुझ्यासाठीच अंत पावलो होतो,
तुझ्यासाठीच संपलो होतो मी,
तुझ्यासाठीच उरलो होतो,
तुझ्यासाठीच जन्मलो होतो मी,
तुझ्यासाठीच प्रेम केलं होतं मी,
तुझ्यासाठीच नातं तोडलं होतं,
हे सगळं केलं खुपकाही सोसल होतं मी
फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच..

संपली नाती त्या लोकांबरोबर सुद्धा
ज्यांना भेटल्यावर वाटायचे
हे आयुष्यभर साथ देणार.

एवढं प्रेम करून सुद्धा
जी माझी नाही होऊ शकली
ती दुसऱ्याची तरी काय होणार.

मला सोडायचं कारण तरी सांगायचं ना
माझ्या वर नाराज होती का
माझ्या सारखे हजार होते

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांशी खेळून.

वाचा: Life Status Marathi

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात
आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यांनी
आणि पुन्हा तुझी आठवण आली.

4. Sad Shayari Marathi Life

आता ना कुणाचं मन दुखवायचं
ना कुणावर हक्क गाजवायचा
शांत राहून आयुष्य जगायचं.

निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि मग आयुष्याच चुकत जाते,
प्रश्न कळत नाही कधी कधी
आणि उत्तरही चुकत जाते,
सोडवताना वाटते सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते,
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते
चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते,
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
प्रेम म्हणजे काय हे तेव्हाच कळते
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते.

खोत प्रेम करणाऱ्याला हवं ते मिळत
पण खरं प्रेम करणाऱ्यांच्या नशिबात मात्र
आठवणी शिवाय काहीच उरत नाही.

माझ्याशी बोलायचं नाही ठिक आहे
पण एक लक्षात ठेव
तू अबोल राहिलेला प्रत्येक दिवस
आपल्यातील अंतर अजून वाढवेल.

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

साकारलेल्या त्या भावनांना
का आज शब्दच नाहीत.
का त्या डोळ्यांमध्ये
माझी एकओळखही नाही.

मनातले सारे सांगण्यासाठी
समोर मनासारखा माणूस नाही
तर त्या माणसाला मन असावं लागतं.

काही लोक नातं टिकवण्यासाठी
प्रेम करतात
तर काही फक्त
त्यांच्या गरजा भागवण्यासाठी.

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे
तुझ्या स्पर्शानी दरवाळणाऱ्या सांजेचे
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी
हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी

चुका तेव्हाच दिसायला लागतात
जेव्हा समोरच्यावरील प्रेम
कमी व्हायला लागतं.

5. Sad Shayari Marathi Status

कधी कधी काही पाऊले अशी पडतात की
सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात.
काही गैरसमज इतके मनाला बोचतात की
आपल्या नकळत सुंदर नाते
हृदयासोबत तोडून जातात.

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन
सामावल्या असत्या तर कदाचीत कधी
डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती
शब्दांचा आधार घेऊन जर
दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी
अश्रूंची गरज भासलीच नसती
आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर
भावनांना किँमत कधी उरलीच नसती.

होतो मला त्रास तुझ्या अशा वागण्याचा
आपलं म्हणून जवळ करून
परकं करून जाण्याचा.

किती Lucky असतात ते लोकं
ज्यांना आपलं पहीलं प्रेम भेटतं
आणि नाही भेटलं तर
ते नेहमी ह्रदयातच राहतं
अगदी शेवटपर्यंत

हसून बघितलं रडून बघितलं
कोणाला तरी आपलं करून परक करून बघितलं
प्रेम करून बघितलं प्रेम देवून बघितलं
जिवन फक्त त्यालाच समजल
ज्याने एकट राहण बघितलं.

माझ्या भिजलेल्या पापण्यांना
अजून कितीवेळा पुसू सांग,
अनं तुझ्यासाठी मन माझं झुरतं

काही आठवणी अशा पण असतात
ज्या काळजाला टोचल्या तर
सरळ डोळ्यातून पाणी काढतात.

सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला
जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला
आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील
सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.

कोणी बदललं याच मला दुःखच नाही
पण कोणीतरी असं होत
ज्याच्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त
विश्वास होता.

मी Single आहे कारण
खोत प्रेम करून Timepass करायची
हिम्मत नाही माझ्यामध्ये.

6. Sad Shayari Marathi New

आयुष्याने एक गोष्ट शिकवली की
आपण कोणासाठीच कायमस्वरूपी
Special नसतो.

आजही मला
एकटच बसायला आवडत,
मन शांत ठेवून
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत,
कधी कधी हसायला
तर कधी कधी रडायला आवडत,
अन कवितांच्या शब्दात
फक्त तुलाच शोधायला आवडत,
माझ्या काही शब्दांमुळे हरवल मी तुला
आज त्या शब्दांना आठवून
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत,
अन तू नसतानाही
तुझ्या ह्या आठवणींच्या विश्वात
फक्त तुलाच पहायला आवडत
फक्त तुलाच पहायला आवडत.

आठवणीतलं प्रेम आणि
प्रेमातल्या आठवणी
कधीच विसरता येत नाहीत.

जर तू माझ्याशी न बोलता
खुश असशील
तर खरंच मी तुला कधीच
आवाज देणार नाही.

कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत
येणाऱ्याच येण मात्र सावलिसारख लांबत
कोणी मग हळुच विचारत कोण येणार होत
तेव्हा खर सांगु डोळ्यात फक्त पाणीच येत..

भीती वाटते कोणाला आपल बनवायची
भीती वाटते काही वचने निभावण्याची
प्रेम तर एका क्षणात होत
पण मोठी किम्मत मोजावी लागते विसरण्याची
खुप ञास होतो जवळचे दूर होताना
म्हणूनच मन घाबरतं आता
कुणालाही जवळ करताना

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले
मी पण हसत राहीले
प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता
मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत
पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचच होत
फक्त त्याचच

ज्यांनी प्रामाणिकपणे नातं टिकवलं
तेच नेहमी रडताना दिसतात.

प्रेम हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही.
जर तो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही
आणि जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही.

आयुष्यातून सर्वच Delete करता येऊ शकत
पण त्या व्यक्ती सोबत घालवलेले काही क्षण
ना विसरता येतात ना Delete करता येतात.

7. Sad Shayari Marathi Bf

अजुन किती तुकडे करणार आहेस
या ‪तुटलेल्या हृदयाचे?
जेव्हा तोडून थकशील
तेव्हा एवढच ‪सांग
त्याची चुक काय होती.

माणसाचं काहीही अधुरं राहील तरी चालेल
पण देवा प्रेम अधुरं राहू देऊ नकोस
कारण माणूस जगू पण शकत नाही आणि
मरू पण शकत नाही.

वाचा: हृदयस्पर्शी मराठी स्टेटस

Trust नाही का तुझा माझ्यावर
हि Line म्हणून
किती लोक विश्वासघात करून जातात.

मनातील दुखाला वाट करून देतात अश्रू
काहीही न बोलता डोळ्यांनी खूप काही बोलून जातात हे अश्रू
आवाज न करता मुक्याने साथ देतात हे अश्रू.

आयुष्य जगणं तेव्हा खूप अवघड वाटतं
जेव्हा आवडणारी व्यक्ती नशिबात नसते.

विश्वास हा एखाद्या
Sticker सारखा असतो
दुसऱ्यावेळी पहिल्यासारखा
चिकटत नाही.

जुने सारे पुरायाला वेळ नाही आता
नवे काही स्फुरायाला वेळ नाही आता
जाता येता पुन्हा अशी खडा नको मारू
तुझ्यासाठी झुरायाला वेळ नाही आता

आठवणी मध्ये नको शोधु मला
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या

सोड ना यार
जे सोडून गेलेत त्यांचं
काय Tension घ्यायचं.
जे आहेत त्यांनाच जपायचं आणि
खुश रहायचं.

आयुष्यात कधीच
हा विचार करत बसू नका की
कोण कसा कधी कुठे आणि
का बदलला ?
फक्त हे बघा की
तो तुम्हाला काय शिकवून गेला.

8. Sad Shayari Marathi Text

घेऊन मला मिठीत
शांत कर या मनाला,
मी खूप समजावलयं
आता तूच समजाव याला.

मला हसवणारी व्यक्ती तूच आहेस
आणि रडवणारी व्यतीसुद्धा तूच आहेस.
कधी कधी तुझ्यामुळे माझं मन रमत
आणि कधी कधी तुझ्या एका गोष्टीमुळे
ते मन सुद्धा कुठे रमत नाही.

नाते हे मोत्याप्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

प्रेम करणारी व्यक्ती अशी हवी जी
फक्त तुमच्या डोळ्यात पाहून
तुमचं मन वाचू शकेल.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते
जेव्हा आपण काही चुका करतो
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते
जेव्हा त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

खूप कठीण असतं
आपल मन दुखावलेलं असताना
समोच्याला मी बरा आहे असं सांगणं

तुझी आठवण म्हणजे कस्तुरी.
कधीच साथ न सोडणारी.
सदैव सोबत दरवळत रहणारी.
पण तशीच हवी हवीशी वाटणारी.

दोन क्षणांची साथ ती
तु मला देशील का..?
सुर तू होऊन
शब्द मला बनवशील का…?
दु:ख तुला होता
हसु माझ्यात शोधशील का..?

खरंच बोलत होत कुणीतरी
प्रेम किती का खरं असेना
एक ना एक दिवस सोडून जातंच.

आयुष्याच्या वाटेवर खूप दु:ख आली
पण तुझ्यासारखे दु:ख कोणी दिले नाही
आता या दु:खाचीही सवय झाली
पण साथ तुझी सोडवत नाही.

9. Sad Shayari Marathi Girl Dp

मला होणार हा त्रास
कमी कर देवा
तुझी शप्पथ परत कधीच
चुकून सुद्धा प्रेमाचं नाव घेणार नाही.

जीव तुटका होतो बोलण्यास
तुला एक वेळ पाहण्यास
तुझ्या जवळ येण्यास
आशा राहते ती मनास
असेच संपतो दिवस
नाही संपत तो प्रवास

वाचा: mood off मराठी स्टेटस

माझ्या आयुष्यात
प्रेमाची केली तू सुरुवात,
माझी इच्छा आहे की
शेवट पण तूच करावासा.

माझ्या मनात ती असते
पण ती माझी नसते,
तिच्या मनात मी नसतो
तरीही मात्र मी तिचाच असतो.

गोड आठवणी आहेत
तेथे हळुवार भावना आहेत
हळुवार भावना आहेत
तेथे अतुट प्रेम आहे
आणि जिथे अतुट प्रेम आहे
तेथे नक्कीच तू आहेस.

भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला ह्रदयाची हाक लागते

ह्रदयाचे दुःख लपवणे
किती कठीण आहे.
एकदा रडल्या नंतर पुन्हा सावरुन हसणे
किती कठीण आहे.
कुणा सोबत चालत असतो
दुर पर्यंत वाटेवर तर
पुन्हा त्याचं वाटेने परतून येणे
किती कठीण आहे.

प्रेम हा मुळात आपला विषय नव्हता
मग त्यात पास होण्याचा विषयच नव्हता.

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी
पण शेवटी तो
माझ्या भावनांशीच खेळला.

असेल परवानगी तर मला होऊ दे व्यक्त
तुझ्याशिवाय मला आता राहता येणं आहे अशक्य
तू सोडलीस माझी साथ
पण कधी मागे वळून आलास तर
तुला कायम मी दिसेन थांबलेली आज.

10. Marathi Shayari Love Sad

तू दिलेल्या दु:खाने मला खूप काही शिकवले
जग कसे असते हे शेवटी मला तूच दाखवले

वाटलं नव्हतं कधी
शब्द माझेच छळतिल मला
याच विचारात होतो
कधीतरी भाव मनाताले कळतील तुला.

खूप वाटतं केव्हातरी
धावत तुझ्याजवळ यावं
बाहुपाशात घेऊन तुला
सारं जग विसरावं
गतकाळच्या आठवणींना
पुन्हा एकदा जगवावं
दु:ख सार सारुन
तुझ्या डोळ्यात साठवावं.

तुझ्यासाठी पूर्ण जग सोडण्याची
तयारी आहे माझी,
पण दुसऱ्या कोणासाठी
तू मला सोडून जाऊ नकोस.

हळुवार जपून ठेवलेले क्षण
तेच माझ्या जगण्याची आस आहे
एकेक साठवून ठेवलेली आठवण
तिच माझ्यासाठी खास आहे.

प्रेमात पडलो तुझ्या
तुला काही ते कळलंच नाही
मी अजूनही तिथेच उभा आहे
तू काही मागे वळून पाहिलं नाहीस.

तुझ्या सहवासात
रात्र जणू एक गीत धुंद
प्रीतीचा वारा वाहे मंद
रातराणीचा सुगंध
हरवावे वाटते तुझ्या कुशीत
करून पापण्यांची कवाडे बंद

आज तुझी खुप आठवण येत आहे
का कोण जाणे पण
आज तुझी खुप आठवण येत आहे
स्वप्नातल्या या दुनियेत
तुझी कमी भासत आहे.

कुणीच कुणाचा नसतो साथी
देहाची आणि होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
कशाला हवी ही खोटी नाती.

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात
काही दोन पावलेच चालतात
आणि कायमची लक्षात राहतात
काही साथ देण्याची हमी देऊन
गर्दीत हरवून जातात.

11. Shayari Marathi Sad

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर

आठवणी हसवतात
आठवणी रडवतात.
काहीच न बोलता
आठवणी निघून जातात.
तरी आयुष्यात शेवटी
आठवणीच राहतात.

मी तुला जाणले नाही
असं कधीच झालं नाही
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम
तुला कधी कळलच नाही.

रोज तुझी आठवण येते आणि
डोळ्यांत पाणी उभं राह्तं
तू जवळ हवास असं वाटताना
खूप दूर आहेस हे सांगून जातं.

तुला पहिल्यांदा जेव्हा बघितले
मनाने माझ्या स्वप्ने तुझी पाहिले
धुंद या राती सारे जग निजले
मनाने तुझ्या स्मृतीची चांदणे पांघरले.

कधीतरी मन उदास होते
हळु हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते.

जे घडत ते चांगल्यासाठीच
फरक फ़क्त एवढाच असतो की
ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं
तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं.

हृदयात येण्याचा रस्ता असतो
पण बाहेर जाण्याचा नसतो
म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना
हृदय तोडुन जातात.

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना शेवटी ठरवलं
विसरुन जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.

12. Love Sad Shayari Marathi

आला जरी असेल वसंत फुलून
जगतो मी अजूनही तुलाच बघून
स्वप्नातही मी तुलाच शोधतो
अमृतमय जीवन तुझे विष मात्र मी प्राशितो.

का कळत नाही तुला
माझंही मन आहे
जे फक्त तुझी अन तुझीच
वाट पाहत आहे

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही
बोललेल कोणाला आवडत नाही
जवळ असलेलेच मग दूर होताना
क्षणाचाही विचार करत नाही.

प्रेम कस असत ते मला बघायचंय.
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

आजही पुन्हा तेच झाले
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले,
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले,
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले,
तरीही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले,
कुणी नाही तु माझी
मनाला माझ्य खुप समजावले,
तरीही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले,
जगायचे आयुष्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरीही पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुष्यच नकोसे झाले.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते.

एक विनंती आहे
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको
Busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर
वेळच देऊ नको.

गोष्ट एक स्वप्नातली
स्वप्नातच राहून गेली,
डोळे होते माझे मिटलेले
आणि रात्र तिने चोरून नेली.

मी आहे जरा असा एकटा एकटा राहणारा
माझे प्रेम् शब्दांनी नव्हे तर
डोळ्यांनी व्यक्त करणारा
मी आहे जरा असा एकटा एकटा राहणारा,
कुणाचे चार शब्द प्रेमाचे ऐकून
त्याच्यावर विश्वास ठेवणारा
मी आहे जरा असा एक्टा एक्टा राहणारा
कुणीही दुखात दिसलं की त्याचे दुःखच वाटणारा
मी आहे जरा असा एकटा एकटा राहणारा
वादळात सुदधा एकटा बसणारा
मी आहे जरा असा एकटा एकटा राहणारा
प्रेयसी बरोबर असताना सुद्धा
तीच्या वीचारात मग्न राहणारा.

प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा.

13. Marathi Sad Shayari Sms

हरलो मी आयुष्याला
नशिबात दु:खच राहिले
तुझी आस होती प्रेमाची
पण माझी ओंजळ रिकामीच राहिली.

पावसाची सर आता नुकतीच बरसली,
आणि तुझ्या आठवणींची पाऊल वाट
पुन्हा एकदा हिरवळली.

तु मला Block च ठेव
कारण तु online दिसलीस ना
कि मला खूप त्रास होतो.

गुन्हा फक्त इतकाचं झाला की
मी तुझ्यावर खरं प्रेम केलं.

काळ्या मातीत पसरत होता
चिबं पावसाच्या सरीचा गंध,
अन् माझं वेड मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी संग.

डोळ्यातून वाहणारा प्रत्येक ‪अश्रू,
निघतो ‪तुझ्या शोधात
आणि नकळत हरवतो
तुझ्या ‪आठवणीच्या गावात.

Final Words

जर तुम्हाला sad shayari marathi Collection आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा आणि सोशल मीडिया वर सुद्धा नक्की शेयर करा.जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा किंवा ई-मेल करून कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.

Leave a Comment