Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी मध्ये 2023

मी खूप साधा मुलगा आहे
मी तर BF ला पण
Best Friend समजतो….

Advertisements

माझं आयुष्य थोडं वेगळंच सुरु आहे
माझी स्वप्न वेगळी होती,
मी केलं काही वेगळंच,
आणि झालं काही वेगळंच,
आणि आता मिळालं काही वेगळंच…..

बर झालं ते लोक स्वतःच बोलायचे
बंद झालेत..
जे आधी फक्त माझ्या सोबत
कामापुरतेच बोलत होते…

तो म्हणाला – अं
ती म्हणाली – हं
पण घरचे म्हणाले – अंहं
खेळ संपला

ज्याला खरंच बोलायचं असत ना
तो Hmm ला पण Reply देतो

काही लोक जिम ला
स्वताची तब्बेत बनवायला जातात कि
स्वताचा फोटो काढायला जातात
हेच मला अजुन कळत नाही….

तु खूप चांगला आणि शांत मुलगा आहेस
असं बोलुन पोरी
तु आता सिंगलच मरणार आहेस
हे सांगुन जातात….

जी लोक तुमचा Message वाचून पण
जर तुम्हाला Reply देत नसेल
तर तुम्ही समजून जायचं की
त्यांना तुमची घंटा गरज नाही… 

इथे पोरांच्या एक एक वर्षाच्या
Love Anniversary साजरा होतात आहेत
आणि इथे आम्ही अजुन पण सिंगलच आहोत….

कधी कधी असं वाटतं की
गर्लफ्रेंड नसणारी पोर
खूप नशीबवान असतात…

माझ्या comments मध्ये मुलींची नावे पाहुन
त्यांना friend request पाठवणाऱ्यांना
देव कधीच माफ करणार नाही…

प्रेम म्हणजे असं झालं आहे की
घरच खायचं आणि
नेहमी दुसऱ्यासाठी मरायचं

कोरोना व्हायरस हा
चीनमध्ये उध्दभवणारा
दुसरा सर्वात वाईट व्हायरस आहे,
पहिला व्हायरस Tik Tok आहे

घरातून बाहेर नका पडू
मित्रांनो
बाहेर पोलिस PUBG खेळत आहे

तुमचं मन जर साफ असेल तर
तुम्हाला आंघोळ करायची सुद्धा गरज नाही

तंबाखूच्या पुडीसारखं जपेण तुला
फक्त चुना लावून जाऊ नकोस..

सगळ्या पोरी मलाच येवून
दादा का म्हणत्यात

आज काल मी एखाद्या फुला सारखा असतो
कधी कधी मी स्वतःच तुटून पडतो
तर कधी कधी दुसरं मला तोडुन जात

एक गोष्ट मात्र खरी आहे
आणि ती म्हणजे
ब्रेकअप झाल्यावर
जिम लावली ना की
बॉडी लवकर बनते…

  जितका राग त्या hmm आणि k चा
येत नाही
त्या पेक्षा पण जास्त राग तर
hoka केल्यावर येतो.

आज काल Handsome असण पण
गुन्हा झालाय
कुणी मुलगी भाव देतच नाही

तिला वाटत असेल
एवढा कसा बद्दलोय मी
अग वेडे तुटलेल्या फूलाचा
रंग बदलणारच ना…

९९ % मुली या स्वताची चूक
कधीच कबुल करत नाही
आणि राहिल्या १ %
ह्या काही वेळानंतर म्हणतात
तु काहीपण म्हण
चूक तुझीच होती…

अजून पण हे डोळे त्यालाच शोधतात
जो म्हणाला होता
भावा Engineering कर लय स्कोप हाय

हात पकडून प्रपोज तर
मी पण करू शकतो,
पण मनात हळूच एक
विचार येतो
च्यायला जामीन कोण करणार ?

आजकाल एखादी मुलगी जर
स्वतःहून आपल्यासोबत बोलायला आली की
आपल्याला प्रश्न पडतो की
हीच आपल्यावर प्रेम वगैरे आहे की काय ???

वाईट काळात आमच्यावर
नारळ फिरवतात
आणि चांगला काळ आला की म्हणतात
विसरला का रे आम्हाला

तू माझ्या पासून दूर आहेस
तेच बरं आहे
कारण जवळ आली कि
माणसे बदलतात.

थोडंस गोड आपणही बोलावं
सगळा भार तिळगुळावर
कशाला द्यायचा

गरजेच्या वेळी माझा हात मागणाऱ्यांना
त्यांची कामे झाल्यावर
तू कोणी
असं म्हणताना पाहिलंय.

तराट व्हा
पण घरी नीट जा

पोरगी आली तर
Future आणि
गेली तर Past

कोणी बाहेरून समर्थन देणारी
तरी आहे का रे ?
१४ तारखेपर्यंत

Online भांडण तोच जिंकतो
ज्याची Typing फास्ट असतें..

Valentine जवळ आला
आणि अजुन एक गर्लफ्रेंड नाही..

शोना बाबू पिल्लू करण्यात
तुमचा वेळ घालवू नका
कष्ट करा आणि मोठे व्हा…!

पाणीपुरी खाऊन झाल्यावर
तो कधी सुखी पुरी पण नाही मागू शकला,
तर तो काय तिचा हात
तिच्या बापाकड मागल…

आयुष्य हे खूप सुंदर आहे
फक्त आपल्यावर जळणाऱ्याची संख्या
जरा जास्त हवी….

सिंगल असण्याचा
सर्वात मोठा फायदा म्हणजे,
आपल्याला वाटेल तेव्हा
ऑनलाइन येता येत…

नेहमी दुसऱ्याच्या पैशांवर प्यायला शिका
कारण त्यात तुम्हाला थोडी लाज वाटेल
पण खरंच जाम भारी वाटेल

काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे,
बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.

मी आरशा समोर असतांना
जगातल्या सर्वात Smart व्यक्तिला पाहिल आहे.

तसा मी आज पण सिंगलच आहे
पण माझ्या दोन गर्लफ्रेंड सोबत

मी कॉलेज ला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना
अशी माझी Ringtone होती.
आता एक वर्ष झाल  माझा मोबाईल Silent वर आहे ..

जी माणसे मला ओळखतात
ते माझ्या वर कधीच शंका घेत नाही …
आणि जी माणसे माझ्यावर शंका घेतात
त्यांनी मला अजुन ओळख़ल नाही….

पाऊस जास्त असेल तर
मुलींनी शक्यतो घराबाहेर पडु नये…
कारण पावसामुळे जर मेक UP उतरला तर …
ब्रेक UP होण्याची शक्यता जास्त आहे.

आज माझी आई मला म्हणत होती…..
तुझ ते Facebook आणि व्हाट्सप वरचे status बंद कर बाळा …
मला काळजी वाटत आहे …
कारण कालपासून तीन पोरींनी मला विचारलय..
‘काय कस काय आत्या’ बराय का आता तो ???

मला “Single” असण्याच अजिबात दुखः नाही
दुखः आहे ते फ़क्त त्या मुलीचं ,
जी फ़क्त माझ्यामुळे अजुन “Single” आहे …
भटकत असेल बिचारी कूठेतरी भलतीकडेच

आता मी आतुरतेने वाट बघतो आहे ती
या ‪‎Limited ‪‎Life मध्ये
एखादी ‪Unlimited ‎प्रेम करणारी भेटली पाहिजे…

मुलींना मेकअप धुण्याआधी
त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल.
Are you sure
you want to restore factory settings?

माझा मित्र
एवढे प्रेमाचे स्टेटस टाकतो की
मी पण कधीकधी
त्याच्या Gf ला Miss करतो

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात..

मी Single आहे कारण
Gf वैगरे आमच्या तत्वात बसत नाही
कारण, आमच्याकडे Direct बायको असते

एक ती वेडी आहे जी मला कधीच समजत नाही
आणि इथे माझे स्टेटस पहायला जग वेड होत आहे

आयुष्यात पोरगी एक सुद्धा पटवली नाही
पण बदनाम असा होतो की जस काय मी
१०० राणींचा राजा होतो.

माझी गर्लफ्रेन्ड मला  म्हणाली
तुला फेसबुक हवय की मी ?
कधी कधी खुप आठवण येते तिची

जर कोणाला Instagram वर
Setting करायची असेल तर
Insta Profile च्या Right Corner वर
Setting Option आहे
तिथुन करुन घ्या

मी तर नेहमी माझी हकीकत लिहतो
आणि लोक बोलता तू स्टेटस मस्त ठेवतोस

काही Screen shot
पुरावे म्हणुन नाही,
तर आठवणी म्हणुन
जपून ठेवावे लागतात…

गर्लफ्रेंड सोबत भांडण करणे म्हणजे
आज्जीला इ फोने मधले फुंकशन
समाजवण्या सारखे आहे

मी केलेलं सगळ्यात जबाबदारीचं काम
तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करणे

अपयशाला घाबरू नका
अपयश तुम्हाला घाबरलं पाहिजे
इतके प्रयत्न करा.

कॉलेज मध्ये खूप मुली पाहिल्या
पण माझं मन मात्र अजून पण शाळेतल्या
त्या पोरींमध्ये गुंतलं आहे

परफेक्ट जोडी
फक्त चपलांची असते
बाकी सगळा गैरसमज आहे

पेपर असे लिहलेत
की समजत नाहीये
पुस्तकं विकू की
Result ची वाट बघू

कुणीतरी माझ्यावर पण प्रेम करा
कारण मला सुद्धा स्टेटस टाकायचे आहेत

ज्यांची बायको चांगलं जेवण बनवतं असेल
तर त्याचे सुगीचे दिवस
जर चांगलं जेवण बनवतं नसेल तर
त्याचे मॅग्गी से दिवस
आणि जर जेवण अजिबात बनवतं नसेल तर
त्याचे स्वीगी चे दिवस…..

मला शिक्षणात नाही तर
माझ्या आयुष्यात top करायचं आहे

शेवटी ती हो म्हणाली
पण आनंदाच्या भरात मी विसरलोच
एप्रिल महिना लागला म्हणून

तुम्हाला यशस्वी होण्यासाठी डिग्री नाही तर
कनौलेज असणं गरजेचं आहे

आयुष्यात खूप पाप केले
आता फक्त पोरींचे नंबर
पोरांच्या नावाने सावे
करायचं बाकी राहील होत

लग्न करताना मुलगा हा नेहमी
समजुतदार असायला पाहिजे
कारण पागल तर त्याला मी
लग्न नंतर पण करू शकते…

माझं नशीब इतका बेकार झालंय कि
जर मी एखादी स्मशानभूमी चालवायला घेतली
तर लोक मारायचे बंद होतील….

खूप बरं वाटतंय आता
अश्या माणसांपासून दूर होऊन
ज्यांना माझ्या पेक्षा परक्यांची किंमत
जास्त वाटते…

शेवटी हा रंग काय आणि
माझा हा जीव काय
लावणार तर फक्त तुलाच…..

जे बाकी जिवन शेष आहे
त्यालाचं विशेष बनवा
एरवी नंतर तर फक्त
अवशेष उरणार आहे

गर्व आहे मला गर्लफ्रेंड नसल्याचा
पण आता काहीच सांगता येत नाही कि
हा गर्व आता अजुन किती दिवस टिकेल…

रुबाबात तर सिंगल लोक जगतात
आणि Relation वाले तर
आयुष्यभर रडके status टाकून जगतात….

मी सुद्धा खरं प्रेम केलं होत
पण म्हणतात ना
Better luck next time
अगदी तसाच झालं.

जितकी वाईट Ex
तितकीच लवकर आणि सुंदर Next

पोरांनी प्रपोज केल्यावर 90%
पोरी नकार देतात,
पोरींनी केल्यावर 90%पोरं
होकारच देतात…

आपल्या मर्जीच तर युजरनेम आणि
पासवर्ड पण भेटत नाही
तर पोरगी लय लांब राहिली

Breakup दुसऱ्याचं होत
आणि Status
आपल्याला बघायला लागतात

स्वतःच नाव इतकं मोठं करा ना की
जिथे पण तुम्ही जाल तिकडे तुमची
ओळख निघाली पाहिजे

facebook आणि whatsapp वर
हवा करण्यापेक्षा
Google वर झळकण्याची इच्छा
मनात ठेवा…

आज तुम्ही फक्त पोरीच घेऊन फिरा
पण आम्ही थोड्याच दिवसात
Mercedes घेऊन फिरणार आहोत…

मला कधीच सिद्ध करायची गरज नाही
मला हे माहित आहे की मी बरोबर आहे..

जी मुलगी जास्त भाव खात असेल
तिला सरळ सरळ दीदी म्हणायचं
आणि विषय संपवायचा…..

एखाद्या मुलीचा Boyfriend बनण्यापेक्षा
असं काहीतरी बना की मुलगी तुमची
बायको बनायची स्वप्ने बघेल…

माझ्या आयुष्याच्या Story चा व्हिलन
कोणी पण का असेना
पण हिरो फक्त मीच असणार..

स्वताची नखं कापल्यानंतर
steel च्या डब्या चे
घट्ट बसलेलं झाकण जो उघडू शकतो ना
तो आयुष्यात वाट्टेल ते करू शकतो…

फक्त एकदा स्वतःवर
विश्वास ठेवून बघा,
घंटा मग जग तुमचं काहीच
वाकड करू शकत नाही…..

स्वतःला इतका मोठा करा ना
कि जर कोणी विचारले कि काय करतोस
तर मन खाली नाही झुकली पाहिजे.

सुखाची झोप फक्त
single लोकांच्या नशिबात असते.

काय हा जमाना आलाय
माझे haters च आजकाल
मला copy करायला लागले आहेत

भावांनो..
मुली पहिल्यांदा पागल करतात
मग पागल म्हणतात
आणि शेवटी पागल म्हणूनच सोडून देतात.

मुलींच्या नावाने अकाउंट
बनवणाऱ्या भावानो
मला कशाला उगाच request पाठवता

लोकांचे दिवस वाईट असतात
आमचा तर जन्मच वाईट चाललाय..

माझा जुना फोटो Profile मधून
उकरून काढून
त्यावर हसणाऱ्या माझ्या मित्रांनो
Lifetime सिंगल रहाल

खरं प्रेम जाऊद्या 
कोणीतरी माझ्यासोबत टाईमपास तरी करा….

Motivational Quotes in Marathi for Success

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल.
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

motivational sms in marathi for success

मराठी प्रेरणादायक सुविचार
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

Motivational Status on Life

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

best motivational thoughts in marathi

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.

marathi motivational thoughts in marathi font

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

life motivational thoughts in marathi

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

Inspirational quotes about life and struggles Marathi

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

insta motivation status marathi

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

motivational quotes in kannada

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.

motivational quotes in marathi whatsapp status

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

motivational images marathi

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !

Leave a Comment