2000+ मराठी सुविचार | Latest Marathi Suvichar 2021

जर तुम्ही marathi suvichar शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहेत कारण आम्ही तुम्हाला उत्कृष्ट marathi suvichar देण्याचा प्रयन्त केला आहे आम्ही आशा करतो की हे मराठी सुविचार तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Suvichar

आवडतं तेच करू नका
जे करावं लागतं
त्यात आवड निर्माण करा.

आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण
सुखी असतोच असं नाही.

विचार करा निर्णय घ्या
आणि तुम्हाला जे योग्य वाटत
तेच करा.

फक्त समाधान शोधा
अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाही.

उपाशी पोटी साधे अन्न देखील
रुचकर लागते.

द्वेष करणे सोपे असते
पण प्रेम करणे
आरोग्यदायक असते.

दुःख हे बैलालासुध्दा
कोकिळेसारखं गायला लावतं.

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे
पण त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं.

परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.

प्रयत्न करत राहा कारण
सुरुवात नेहमी कठीणच असते.

चांगले पुस्तक म्हणजे
मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.

विज्ञानाचं तंत्र शिका पण
जगण्याचा मंत्र हरवू नका.

जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका
परिस्थितीवर मात करा.

आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसें
जास्त सुख देतात

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

मेंदूच्या शक्ती सूर्याच्या किरणांसारखेच असतात
जेव्हा ते केंद्रित असतात
तेव्हा ते चमकतात.

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध
ज्याच्या अंगी असते
तोच खरा कर्तृत्ववान होय.

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो
कारण सौंदर्य नष्ट होते.

जो वेळ काढतो
त्याला सर्व काही मिळते.

आग आपल्याला उष्णता देते
आपला नाश देखील करते
हा अग्निचा दोष नाही.

श्रीमंताचे बंगले चांगले असतात
पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या
पाडत नाही.

समाधान म्हणजे ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते
आणि नमस्कार करते….

रात्री शांत झोप येणे सहज नाही
त्यासाठी संपूर्ण दिवस
प्रामाणिक असावं लागतं.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते
तो कूठल्याही काळोखातून
सहज मार्ग कढतो.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि जी
एकदाच खर्च करून त्याचा
आयुष्यभर आनंद उपभोगता येतो
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा
संयम हे त्याचे रहस्य होय.

मरण सोपे असते जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.

पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो.

नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ
आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे येते.

स्वाभिमान हा
सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल

अपयश आपल्याला
यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही
ते कसं आणि केव्हा वापरायचं
याचंही ज्ञान हवं.

आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा
कारण जर आज नाही तर कधी नाही
लोक काही वेळ लक्ष घालतील
फक्त थांबु नका तुमचे टप्पा कधीतरी येईल.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

गरिबी असूनही दान करतो
तो खरा दानशूर.

स्वतःला कमकुवत समजणे हे
सर्वात मोठे पाप आहे.

स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते
तोच खरा शिक्षक.

गवताच्या पात्यावरुन
वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर
कुठलीही गोष्ट अवघड नाही.

जर यशाच्या गावाला जायचे असेल तर
अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.

शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.

संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.

बालमनाची कली प्रेमाच्या फूंकरने फुलवित असतात तेच गुरु

मनावर काबू ठेवणे म्हणजे
मनुष्याचा विकास आणि
मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे
म्हणजे विनाश होय.

कुणालाही जिंकायचं असेल तर
प्रेमाने जिंका.

द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.

अंगावर जबाबदारी पडली कि ती
सर्वकाही शिकवतेच.

परीक्षा म्हणजे
स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते तर
टीका सुधारण्याची संधी.

गरज ही ज्ञानाची जननी आहे.

अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

जो मूळ सोडून फांद्यांचा शोध घेतो
तो भरकटतो.

आयुष्यात काही प्रसंग असे येतील की
आपण काही चुकीचे करत नसतो किंवा
आपण चुकीचे नसलो
तरी आपण चुकीचे ठरवलो जातो.

नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा
जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती
कितीही बलाढय स्पर्धक असले
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.

जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश मिळते.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते
आजच ठरवा….आत्ताच !

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते
तुमच्याजवळ काहीच नसतांना
तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना
तुम्ही दाखवलेला रुबाब.

डोक्यावर बर्फ व
जीभेवर साखर असली की
सारे प्रश्न आपोआप सुटतात.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे
देहाची विक्री केल्यासारखे आहे.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे
आणि ज्ञान,भक्ती व कर्म याशिवाय जिवन आंधळे आहे.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही
तो स्वतःहून शिकतो.

वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.

चांगल्या कामाला मांजरांपेक्षा
माणसेच जास्त आडवी येतात…!!!

मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का !

एका वेळी एक गोष्ट करा
आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला
आणि बाकी सर्व विसरा.

जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.

शांततेच्या काळात जर
जास्त घाम गाळला तर
युद्धाच्या काळात
कमी रक्त सांडावे लागते.

जो धोका पत्करण्यास कचरतो
तो लढाई काय जिंकणार !

कठोर परिश्रमाला पर्याय नाही.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

दुःखाची झळ आणि वेदनांची कळ
त्याच लोकांना जास्त कळते
जे प्रामाणिकपणे आणि
साधे सरळ आयुष्य जगत असतात.

मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.

बुद्धीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकार करू नका.

मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.

पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा
जीवन श्रीमंतीत घालवावे.

ज्ञान दुसऱ्याला देता येते पण
शहाणपण देता येत नाही.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा
एकटे बसणे बरे आणि
एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे
त्याहून बरे.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका
कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर
ते पुसायला किती जण येतात ते मोजा.

जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो.

शिस्त लावून घ्या भरपूर मेहनत करा.

स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद

आयुष्यात नशीबाचा भाग
फक्त एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग
नव्याण्णव टक्के असतो.

धन्य आहेत ते शरीर जे इतरांची सेवा करण्यात नष्ट होते.

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे
जो राजवाड्यात जेवढी चव देतो
तेवढीच चव झोपडीत पण देतो.

एकदा मरण जवळून पाहिलं ना कि
जगण्यातील भय निघून जात.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

उद्याचं काम आज करा आणि
आजचं काम आत्ताच करा.

घाबरटाला सारेच अशक्य असते.

आयुष्यात पैसा हवा पण
पैशात आयुष्य नको
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास
तो कमी कडू लागतो.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्याचा अनादर करू नका.

आपण स्वतःच स्वतःच्या नशिबाचे निर्माता आहोत.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं
यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे
आत्मविश्वास.

आपलं जे अस्तित्व आहे
व्यक्तिमत्व आहे
ते स्वतः बनवल्याशिवाय उ
द्या तारणारे कोणी नाही.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका
आहे तो परिणाम स्वीकारा.

पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.

समाधानी राहण्यातच
आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.

चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला
बाकीचे परमेश्वर पाहून घेईल
हा विश्वास मनात असला की
येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाचा असेल.

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही
परंतू आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करु शकतो.

वाईट बातमीला पंख असतात तर
शुभ बातमीला पायच नसतात.

आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला
योग्य धडा शिकवते
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.

वेळ आपला आहे
हवे असल्यास सोनं करा
आणि हवं असल्यास झोपेत घालवा.

ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते
ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.

एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर
तो कमी होत जातो.

कमी ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे.

आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांच…

स्वप्न पाहतच असालं तर
मोठीच पहा लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच 
रक्त ढवळू शकतात.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण
कोणत्यातरी एका क्षेत्रात
सतत उगाळावा लागतो.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

माणूस अपयशाला भीत नाही
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

स्वातंत्र्य म्हणजे संयम…..
स्वैराचार नव्हे.

या जगात एकच जात आहे- माणूस !
धर्मही एकच- माणूसकी!

सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.

आपली चांगली वेळ जगाला सांगते की
आपण काय आहोत
परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग काय आहे.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.

दुर्बल मनाचा मनुष्य कधीच महात्मा होऊ शकत नाही.

इतिहासात भविष्य शोधत बसायचं की
भविष्यात इतिहास घडवायचा
हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

आयुष्यात प्रेम करा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

जगण्याचा दर्जा हा आपल्या
विचारांवर अवलंबून असतो
परिस्थितीवर नाही.

इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो
आणि सत्याचा प्रकाश असतो.

निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो.

सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा
आशा बाळगणे चांगलेच असते.

सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका
वेळ वाया जाईल.

आकांक्षा, अज्ञान आणि असमानता हे
गुलामांचे त्रिमूर्ती आहेत.

जो वेळ वाया घालवतो
त्याच्याजवळ गमवायलाही
काही उरत नाही.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

मेहनत नावाचा मित्र सोबत असला की
अपयश नावाच्या शत्रूची
भीती वाटत नाही.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण
पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते
ज्ञान तुमचेच रक्षण करते.

संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

जो खूपच सुरक्षित आहे
तो असुरक्षित आहे.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात
त्याची खपली काढू नये.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका

संघर्षाशिवाय कधीच काहीच
नवे निर्माण झाले नाही.

नात्याची सुंदरता ही
एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण
एकही दोष नसलेल्या माणसाचा
शोध घेत  बसलात तर
आयुष्यभर एकटे रहाल.

जगात सर्व काही आहे
परंतु समाधान नाही
आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे
परंतु धीर नाही.

कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो.

कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.

अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !

कालला आजचा जास्त वेळ घेऊ देऊ नका.

सुरुवात कशी झाली
यावर बऱ्याच घटनांचा
शेवट अवलंबून असतो.

माझं म्हणून नाही
आपलं म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगल आहे
फक्त चांगलं वागता आलं पाहिजे.

इतरांवर अवलंबून राहणे
शहाणपणाचे नाही
शहाण्या माणसाने
स्वतःच्या पायावर उभे राहून
काम केले पाहिजे
हळू हळू सर्व काही ठीक होईल.

जग भित्र्याला घाबरवते आणि
घाबरवणाऱ्याला घाबरते.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे
स्वतःला ओळखणं.

आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं
ते आपलं नसतं.

जगात सारी सोंगे करता येतात
पण पैशाच सोंग करता येत नाही.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे
जास्त श्रेष्ठ.

टाकिचे घाव सोसल्या शिवाय
देवपण अंगी येत नाही.

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

दुसऱ्याला शिकवत असतांना
माणूस स्वतःला शिकवत असतो.

माणसानं राजहंसासारखं असावं
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं
नाही ते सोडून द्यावं.

माणसाचं छोट दुःख
जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की
त्याला सुखाची चव येते.

आयुष्य सहज सोप जगायला शिका
तरच ते सुंदर होईल.

विचार करा,
काळजी करू नका
नवीन कल्पनांना जन्म द्या.

पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून
खचून जाऊ नका कारण
यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच होत असते.

तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष असते.

जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.

नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका.

बाह्य स्वभाव हा आंतरिक स्वभावाचा
फक्त एक मोठे रूप आहे.

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.

पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती.

ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.

अभ्यास करुण
कोणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा
कोण मेलय
असे मी कधी ऐकले नाही.

सामर्थ्य म्हणजे जीवन
दुर्बलता म्हणजे मृत्यू
विस्तार जीवन आहे
आकुंचन मृत्यू आहे
प्रेम म्हणजे जीवन
शत्रुत्व म्हणजे मृत्यू

आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा
दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून
सावध रहा.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास
आपण आपले वर्तमान गमवाल.

मला जीवनात संघर्ष करायचा आहे
मला जगायचं आहे
मला यश मिळवायचं आहे.

ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.

हृदये परस्परांना द्यावीत
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही
तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे मन ही जुळत नाही.

तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

शहाण्याला शब्दांचा मार.

स्वतःवर  विश्वास असेल तर
जगात कोणतीही गोष्ट शक्य नाही.

विपरीत परिस्थितीत काही लोक
तूटून जातात तर
काही लोक रेकॉर्ड तोडून काढ़तात.

जेव्हा एखादी कल्पना केवळ मेंदूचा ताबा घेते
तेव्हा ती वास्तविक शारीरिक किंवा
मानसिक स्थितीत बदलते.

उषःकाल कितीही चांगला असला तरी
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय
पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी
कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे
वादविवाद.

रिकामे डोके शैतानाचे घर असते.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

बोलावे की बोलू नये
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

जीवन हे फुल आहे
आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.

जीवन ही एक जबाबदारी आहे
क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.

प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा करू नका.

फक्त पंख असून उपयोग नाही
खरी आकाशातील उंच भरारी
त्या पंखात असणाऱ्या हौसल्यात असते..

श्रम हेच जीवन.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.

संयम हेच खरे औषध.

जूनी खपली काढून
बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात
शहाणपणा नसतो.

कष्टानं मिळवलेला एक छदाम
आयता मिळालेल्या घबाडापेक्षा
अधिक मौल्यवान आहे.

काही गोष्टी आपल्याला
प्रिय नसतानाही कराव्या लागतात
कर्तव्य म्हणून.

आधी सिध्द व्हा
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.

जे स्वतःसाठी जगतात ते मरतात
जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

आयुष्यात काही शिकायचे असेल तर
कठीण परिस्थितीत हि शांत राहणं शिका.

जो स्वत: दु:खातून गेला नाही
त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?

जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंल
तर स्वतःला नशीबवान समजा कारण
देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो
ज्याच्यामध्ये धमक असते.

थोर काय सामान्य काय
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जीवन नेहमीच अपूर्ण असते
आणि ते अपूर्ण असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.

प्रत्येक पाऊल योग्य नसते पण
धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा
खूप ससे आडवे येतील
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण
व्यक्ती कधी ना कधी संपते
पण व्यक्तीमत्व हे सदैव जिवंत राहते..

जेव्हा काही माणसांना तुमच्यातले
चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले
वाईट सांगायला सुरुवात करतात.

न हरता,
न थकता
न थाबंता प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो
मोकळा असूनही गुलाम आहे.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.

संयम हा खुप कडवट असतो
पण त्याच फळ फार गोड असते.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि
तुम्ही किती असामान्य आहात.

चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही ही आवश्यक असतात
चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि
चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात..

आयुष्य हे असच जगायचं असत
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा
जग आपोआप सुंदर बनत.

आयुष्याचे ५ नियम
१ स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका
२ जास्त विचार करणं बंद करा.
३ भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
४ दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार करू नका
५ सतत आनंदी रहा.

कोणाचा निषेध करू नका
जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल
तर नक्कीच वाढवा
जर आपण वाढवू शकत नाही तर
हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या
आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

वाचा: वाचा मराठी म्हणी

Conclusion

जर तुम्हाला marathi suvichar आवडले असतील तर comments च्या माध्यमातून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा जर तुमचे काही विचार आणि मत असेल तर नक्की कळवा.
तुम्हाला हे marathi suvichar आवडले असतील तर तुमच्या मित्रांना तसेच सोशल मीडियावर नक्की share करा.

Leave a Comment