1500+ मराठी म्हणी | Best Marathi Mhani

जर तुम्ही marathi mhani शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहेत कारण आम्ही तुम्हाला उत्कृष्ट mhani in marathi देण्याचा प्रयन्त केला आहे आम्ही आशा करतो की हे मराठी म्हणी तुम्हाला नक्कीच आवडतील.

List Of Marathi Mhani

  1. अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
  2. आयत्या बिळात नागोबादुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
  3. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते – एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.
  4. आधी पोटोबा मग विठोबा – आधी पोटाची सोय पहावी नंतर देवधर्म करावा.
  5. अडला हरी गाढवाचे पाय धरी – एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
  6. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
  7. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही.
  8. आधी शिदोरी मग जेजूरी – आधी भोजन मग देवपूजा
  9. असतील शिते तर जमतील भुते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
  10. आपलेच दात आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे.
  11. अंथरूण पाहून पाय पसरावे – आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
  12. आलीया भोगाशी असावे सादर – कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
  13. अचाट खाणे आणि मसणात जाणे – खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
  14. इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती होणे.
  15. उठता लाथ बसता बुकी – प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
  16. उडत्या पाखराची पिसे मोजणे – अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
  17. उचलली जीभ लावली टाळ्याला – विचार न करता बोलणे.
  18. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखविणे.
  19. उथळ पाण्याला खळखळाट फार – थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
  20. कर नाही त्याला डर कशाला – ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केलेली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
  21. करावे तसे भरावे – जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
  22. कधी तुपाशी तर कधी उपाशी संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
  23. खर्याला मरण नाहीखरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
  24. गरजवंताला अक्कल नसते – गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
  25. खोट्याच्या कपाळी गोटा वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
  26. खाण तशी माती आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
  27. गाढवाला गुळाची चव काय – मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
  28. गाढवाच्या पाठीवर गोणी – एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.
  29. गोगलगाय नि पोटात पाय – एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
  30. चोराच्या उलटया बोंबा – स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.
  31. चोरावर मोर – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे.
  32. ज्याच्या हाती ससा तो पारधी – ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
  33. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
  34. पी हळद हो गोरी – एखाद्या गोष्टीत खूप उतावळेपणा दाखविणे.
  35. मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही – स्वतः मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही.
  36. एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
  37. कावळा बसायला अन फांदी तुटायला – परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
  38. गरज सरो नि वैध मरो – आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
  39. घर ना दार देवळी बिर्हाड – बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
  40. घर पहावे बांधून लग्न पहावे करून – अनुभवाने माणूस शहाणा होतो.
  41. घरोघरी मातीच्याच चुली – सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
  42. चोर सोडून सान्याशाला फाशी – खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
  43. ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट – जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
  44. डोंगर पोखरून उंदीर काढणे – प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
  45. तोंड दाबून बुक्यांचा मार – एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
  46. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे – फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
  47. नाचता येईना अंगण वाकडे  – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो.
  48. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर.
  49. आवळा देऊन कोहळा काढणे – क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
  50. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली – अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
  51. अळी मिळी गुप चिळी – रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
  52. इच्छा तिथे मार्ग – एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
  53. उचलली जीभ लावली टाळ्याला – विचार न करता बोलणे.
  54. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये – कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
  55. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
  56. कामापुरता मामा ताकापुरती आजी – आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
  57. काळ आला होता पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
  58. कानामगून आली आणि तिखट झाली – मागून येऊन वरचढ होणे.
  59. करावे तसे भरावे – जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
  60. आपला हात जगन्नाथ – स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
  61. आईजीच्या जीवावर बाईजी उदार – दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
  62. उंदराला मांजर साक्ष – वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
  63. एक ना घड भारभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
  64. ऐकावे जनाचे करावे मनाचे – लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
  65. ओळखीचा चोर जीवे सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
  66. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ – आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
  67. कोल्हा काकडीला राजी – क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
  68. कोरड्याबरोबर ओले ही जळते – निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
  69. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही – निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
  70. काखेत कळसा नि गावाला वळसाहरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
  71. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीक्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
  72. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
  73. गर्वाचे घर खालीगर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
  74. घोडे खाई भाडे – धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
  75. चढेल तो पडेल – गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
  76. चालत्या गाडीला खीळ – व्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे.
  77. चोराच्या मनात चांदणे – वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
  78. जळत्या घराचा पोळता वासा – प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
  79. जळत घर भाड्याने कोण घेणार – नुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
  80. जशी देणावळ तशी धुणावळ – मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
  81. झाकली मूठ सव्वा लाखाची – व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
  82. डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एक आणि उपचार दुसराच
  83. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला – वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
  84. ताकापुरते रामायण – आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
  85. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
  86. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
  87. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
  88. आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
  89. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे.
  90. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.
  91. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही.
  92. आचार भ्रष्टी सदा कष्टी – ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दु:खी असतो.
  93. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.
  94. आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं – स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
  95. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला – ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे.
  96. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
  97. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
  98. एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
  99. एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
  100. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
  101. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
  102. खाऊ जाणे ते पचवू जाणे – एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
  103. खाऊन माजावे टाकून माजू नये – पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
  104. गर्जेल तो पडेल काय – काय केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
  105. गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ – मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार.
  106. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
  107. गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बरा होता – मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
  108. तळे राखील तो पाणी चाखील – आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
  109. कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे – पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
  110. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काल वाट पहावी लागते.
  111. देखल्या देवा दंडवत – वरकरणी, खोटे खोटे केलेले स्वागत.
  112. असतील शिते तर जमतील भूते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.
  113. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.
  114. आजा मेला नातू झाला – नुकसान झाल्यावेळी फायद्याची गोष्ट घडणे. 
  115. अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ वस्तुपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
  116. इच्छा परा ते येई घरा – दुसऱ्याच्या बाबतीत वाइट चिंतन करते आणि तेच आपल्या वाट्याला येणे.
  117. आईचा काळ बायकोचा मवाळ – आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
  118. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते – अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
  119. अहो रूपम अहो ध्वनी – एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
  120. उधारीचे पोते सव्वाहात रिते – उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
  121. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी – कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
  122. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
  123. कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच – किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही.
  124. कुडी तशी पुडी – देहाप्रमाणे आहार असतो.
  125. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच – कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
  126. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे – रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
  127. गाव करी ते राव ना करी – श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
  128. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत – दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
  129. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
  130. गुरुची विद्या गुरूला फळली – एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
  131. गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य – ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
  132. गोरागोमटा कपाळी करंटा – दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
  133. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात – एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
  134. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे – स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे.
  135. घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते – आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
  136. चमत्काराशिवाय नमस्कार नाही पराक्रमावाचून पोवाडा नाही – लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
  137. चिंती परा येई घरा – दुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
  138. पाण्यात राहुन माशांशी वैर करू नये – ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
  139. जन्माला आला हेला पाणी वाहून मेला – निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
  140. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे – दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
  141. ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी – एकमेंकाचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे.
  142. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे – एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
  143. जी खोड बाळ ती जन्मकळा – लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
  144. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी – मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
  145. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही – कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
  146. टिटवी देखील समुद्र आटविते – सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
  147. तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला – भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
  148. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
  149. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
  150. गाता गळा शिंपता मळा – जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः पेलल्याशिवाय येत नाही.
  151. असे साहेब किती सांमटीत हिंडे राती – नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो.
  152. अर्थी दान महापुण्य – गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
  153. अन्नाचा येतो वास, कोरीच घेते घास – अन्न न खाणे पण त्यात मन असणे.
  154. आपलं ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं पहायचं वाकून
  155. आला भेटीला धरला वेठीला
  156. आडात नाही तर पोऱ्ह्यात कूठून येणार – आईवडिलांप्रमाणेच त्यांची मुलं असतात.
  157. आगी शिवाय धूर दिसत नाही – कोणतीही घटना अशीच घडत नाही. त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असतं.
  158. वड्याचं तेल वांग्यावर काढणे – एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढणे.
  159. बुडत्याला  काठीचा आधार – संकटकाळात कधी कधी छोटीशी मदतही मोलाची ठरते.
  160. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं – थोड्याशा कौतुकानेही शेफारून जाणं.
  161. ओल्याबरोबर सुके जळते – वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यास कधी कधी चांगल्या लोकांचेही नुकसान होते.
  162. तहान लागल्यावर विहीर खणणे – एखाद्या गोष्टीची गरज लागल्यावर तिचा शोध घेणे.
  163. तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना – एखाद्याशी न पटणे पण तो लांब गेल्यावर त्याचीच आठवण काढणे किंवा त्याच्याबाबत विचारणे.
  164. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न – एखादं काम करताना त्याच्यात अनेक अडथळे येणे.
  165. लाथ मारेन तिथे पाणी काढेन – कोणत्याही कामात यश मिळवण्याचा आत्मविश्वास असणे.
  166. पडत्या फळाची आज्ञा – एखाद्या गोष्टी करायची तर असते पण केल्यावर असं दाखवणे की, दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून केली.
  167. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.
  168. नावडतीचं मीठ अळणी – एखादी व्यक्ती नावडती आहे म्हटल्यावर तिने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंतीस पडतच नाही.
  169. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण – स्वतःला काहीही येत नसताना लोकांना शहाणपणा सांगणे.
  170. एक गाव बारा भानगडी – एकच व्यक्ती जेव्हा अनेक वाईट गोष्टी एकाच वेळेला करत असते.
  171. एक ना धड भाराभर चिंध्या – कोणतंही एक काम नेटाने न करता इतर गोष्टींच्या पाठी धावणे.
  172. एकटा जीव सदाशिव – जो माणूस एकटा असतो त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं बंधन नसतं.
  173. एका कानाने ऐकावे  दुसऱ्या कानाने सोडून द्यावे – कोणी आपल्याबद्दल वाईट बोलल्यास मनाला न लावून घेणे.
  174. ओठात एक आणि पोटात एक – सांगताना एक सांगणे पण करताना वेगळेच करणे.
  175. कशात काय अन फाटक्यात पाय – काहीही दोष नसताना संकटात पडणे.
  176. काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम – काहीही काम न करता दिखावा करणे.
  177. हातच्या कंकणाला आरसा कशाला? – जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुरावा लागत नाही.
  178. देश तसा वेश – परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे.
  179. कोल्ह्याला द्राक्षे आंबट – एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून तिला नावं ठेवणं.
  180. चुकला फकीर मशिदीत – एखाद्याला व्यक्तीला कितीही सुधारायचा प्रयत्न केला तरी ती पुन्हा तिच गोष्ट करते.
  181. चोर नाही तर चोराची लंगोटी – जेथे काहीही मिळण्याची अपेक्षा नसताना छोटीशी गोष्ट मिळाल्यावर समाधान मानणं.
  182. छडी लागे छमछम विद्या येई घमघम – सहजासहजी न समजणारी गोष्ट शिक्षा केल्यावर लगेच लक्षात येते.
  183. जसा भाव तसा देव – तुम्ही देवावर जशी श्रद्धा ठेवाल तसा देव तुम्हाला फळ देईल.
  184. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – जो आपल्यावर उपकार त्याचे उपकारकर्त्याचे ऋण कधीही विसरू नये.
  185. जेथे पिकतं तिथे विकतं नाही – एखादी गोष्ट आपल्याकडे आहे म्हणून तिचं महत्त्व नसणं.
  186. ज्याचं जळतं त्यालाच कळतं – ज्याला त्रास होतो त्यालाच त्याच दुःख कळतं.
  187. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे – एखाद्याला उपदेश करूनही त्याचा उपयोग न होणे आणि त्याने परत तसेच वागणे.
  188. एका माळेचे मणी – सगळी माणसं एकसारख्याच स्वभावाची असणे.
  189. भातावरून शिताची परीक्षा – एखाद्या छोट्या गोष्टीवरून मोठ्या गोष्टींचे अनुमान लावणे.
  190. तीन तिघाडा काम बिघाडा – तीन हा आकडा आला की, काम बिघडतं असा समज आहे.
  191. तोंडात तीळ भिजणे – एखाद्याला महत्त्वाची गोष्ट विश्वासाने सांगितल्यावरही तो जेव्हा ती जगभर करतो.
  192. थांबला तो संपला – आपलं कार्य अविरत सुरू ठेवावं अपयश मिळालं म्हणून थांबू नये.
  193. दगडापेक्षा विट – मोठ्या संकटापेक्षा छोटं संकटं कमी नुकसानदायक असतं.
  194. दात आहे तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत – एक गोष्ट करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी दुसरी गोष्ट उपलब्ध नसणे.
  195. दाम करी काम – पैसे खर्च केले तर सगळी काम लगेच होतात.
  196. दिव्याखाली अंधार – कधी कधी दिग्गजांमध्येही दोष असतो.
  197. दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं – एखादी व्यक्ती जसं दाखवते ती खऱ्या आयुष्यातही तशीच असेल याची शाश्वती नसते.
  198. दुरून डोंगर साजरे – प्रत्येक व्यक्ती तिला लांब असेपर्यंत चांगलीच वाटते. सानिध्यात आल्यावर खरा स्वभाव कळतो.
  199. दृष्टी आड सृष्टी – एखादी गोष्ट जोपर्यंत माहीत नसते तोपर्यंतच चांगल असतं.
  200. हाजिर तो वजीर – जो वेळेला उपस्थित असतो त्याचाच फायदा होतो.
  201. दैव देते आणि कर्म नेते – जेव्हा नशिबाने मिळालेली एखादी गोष्ट स्वतःच्या चुकीने गमवावी लागते.
  202. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ – दोघांच्या भांडणात नेहमीच तिसऱ्याचा फायदा होतो. त्यामुळे वाद टाळावेत.
  203. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी – दोन दगडावर कधीही पाय ठेऊ नये. नाहीतर पदरी निराशाच पडते.
  204. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे – अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
  205. धरलं तर चावतंय आन सोडलं तर पळतंय – एखाद्याला मदत केली तरी वाईट होणं आणि नाही केली तरी वाईट ठरणे.
  206. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी – एखाद्याला मदत केल्यावर त्याने गैरफायदा घेणे.
  207. कर्त्याचा वार शनिवार – एखादं काम करायचं नसल्यास हजार कारणं देणं.
  208. नेमेचि येतो मग पावसाळा – एखादी गोष्ट वारंवार घडणे.
  209. पदरी पडले आणि पवित्र झाले – जे असेल त्यात समाधान मानावे.
  210. पहिले पाढे पंच्चावन्न – एकदा केलेली चूक पुन्हा करणे.
  211. पोट भरे खोटे चाले – एखादी गोष्ट नको असतानाही उगाच कांगावा करणे.
  212. प्रयत्नांती परमेश्वर – प्रयत्न केले तर देवही नक्की फळ देतो.
  213. पेरावे तसे उगवते – तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळतं. त्यामुळे नेहमी चांगलं काम करा.
  214. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे – एखाद्या कामासाठी इतके प्रयत्न करावे की,अशक्य ही शक्य होईल.
  215. नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे – देवाच्या नावाने स्वतःचा स्वार्थ साधणे.
  216. बुडत्याचे पाय खोलात – अधोगती सुरू झाल्यावर माणसाला जेव्हा अजून दुर्बुद्धी सुचते.
  217. भरोशाच्या म्हशीला टोणगा – जेव्हा एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो आणि तोच नेमका दगा देतो.
  218. भिंतीला कान असतात – कधीही कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्याआधी काळजी घ्यावी.
  219. भित्यापाठी ब्रम्हराक्षस – ज्याने चूक केलेली असते त्यालाच परिणामांची भिती वाटते.
  220. लागले म्हणून कोपऱ्याने खणू नये – एखादी व्यक्ती चांगली म्हणून तिचा अति फायदा घेऊ नये.
  221. मनी वसे ते स्वप्नी दिसे – जे आपल्या मनात असतं तेच स्वप्नातही दिसतं. त्यामुळे नेहमी चांगला विचार करा.
  222. माकडाच्या हातात कोलीत – अयोग्य व्यक्तीला अधिकार मिळणं.
  223. मी नाही त्यातली अन कडी लावा आतली – एखाद्याला गोष्ट दुसऱ्याला नाही म्हणायची आणि स्वतः तिच गोष्ट करायची.
  224. मोडेन पण वाकणार नाही – कितीही त्रास किंवा नुकसान झालं तरी तत्त्वांशी तडजोड न करणे.
  225. म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावलाय – एखाद्याची चूक असेल तर त्याला वेळीच सांगावं नाहीतर तो आपल्याला डोईजड होऊ लागतो.
  226. जशी राजा तशी प्रजा – सामान्यजन हे समाजातील मोठ्या व्यक्तीचं अनुकरण करत असतात.
  227. रोज मरे त्याला कोण रडे – एखादी गोष्ट वारंवार झाल्यावर त्यातील स्वारस्य कमी होऊन जातं.
  228. लंकेत सोन्याच्या विटा – एखादी गोष्ट दुसऱ्याकडे असणे पण आपल्याला तिचा उपयोग नसणे.
  229. लहान तोंडी मोठा घास – आपली क्षमता नसताना एखादी मोठी गोष्ट करण्याचं ठरवणे.
  230. लेकी बोले सुने लागे – एकाला बोलल्यास दुसऱ्यास त्रास होणे.
  231. वराती मागून घोडे – एखादी गोष्ट घडून गेल्यावर तिच्यासाठी उपाय करणे.
  232. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर – विंचू हा कधीच बिऱ्हाड करत नाही. तसंच काही व्यक्तीचं असतं. ते फक्त गरजेपुरत्या गोष्टी वापरून आयुष्य जगतात.
  233. शिळ्या कढीला ऊत – जुन्या गोष्टी पुन्हा उगाळणे.
  234. सगळं मुसळ केरात – एखाद्या गोष्टीसाठी केलेली मेहनत वाया जाणे.
  235. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – पापी माणसाची दोस्ती केल्यास स्वताच्या जीवालाही धोका निर्माण होतो.
  236. अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज – कोणत्याही गरजू व्यक्तीला अक्कल नसत.
  237. अंधारात केले पण उजेडात आले – एखादी गोष्ट लपून केली परंतु काही दिवसांनी ती लोकांपुढे आली.
  238. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे – एखादयाची ठराविक गोष्टीसाठी मदत घ्याची आणि त्याच बरोबर अजुन भरपूर गोष्टींसाठी परत त्याच्यापुढे हात पसरायचे
  239. अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण – जीव जाणाऱ्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना खुप त्रासदायक असतात.
  240. अंगावरचे लेणे जन्मभर देणे – सोने चांदी खरेदी करण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि जन्मभर फेडत बसायचे. 
  241. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे – नुसतेच नाव मोठे पण काम लक्षण खोटे.
  242. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था – अशक्यप्राय गोष्टींची परिकल्पना.
  243. अती झाले अन आसू आलेकाही गोष्टींचा अतिरेक झाला की त्या त्रासदायक वाटतात.
  244. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे – काम एकाचे आणि त्रास दंड मात्र दुसऱ्याला.
  245. अन्नाचा येतो वास आणि कोरीचा घेते घास – एखादे अन्न खुप आवडते पण त्याच्यात चूका काढ़ने.
  246. अर्थी दान महापुण्य – एखाद्या गरजवंत माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
  247. आईची माया अन् पोर जाईल वाया – खुप प्रेम लाड केल्याने मुले बिघडतात.
  248. आंधळ्या बहिऱ्याची गाठ – एक काम करण्यासाठी दोन असमर्थ माणसांची भेट होने.
  249. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी – स्वतःच चूक करून ती दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होने. 
  250. अडली गाय फटके खायअडचणीत सापडलेल्या माणसाला हैरान करने.
  251. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा – असेल त्या दिवशी मजा करने नसेल त्या दिवशी बोम्बलने.
  252. अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का गोष्टींला ठराविक मर्यादा असतात.
  253. अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूपअतिशय उतावळेपणाची लक्षण.
  254. अठरा नखी खेटरे राखी वीस नखी घर राखी – मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.
  255. अवचित पडे नि दंडवत घडेस्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे.
  256. अवसबाई इकडे पुनवबाई तिकडेदोन विरुद्ध बाजु.
  257. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन – दुसऱ्याचा तोटा करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.
  258. आधीच तारे त्यात गेले वारेविचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
  259. आधीच मर्कट तशातही मद्य प्यालाआधीच करामती त्यात मद्य प्राशन केल्याने बिकट स्तिथि निर्माण होने.
  260. अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा – मुख्य गोष्टीपेक्षा नको त्या गोष्टींचा खर्च जास्त असणे.

वाचा: मराठी सुविचार

वाचा: मराठी सुविचार

वाचा: फेसबुक मराठी स्टेटस

Final Word

जर तुम्हाला marathi mhani आवडले असतील तर comments च्या माध्यमातून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा जर तुमचे काही विचार आणि मत असेल तर नक्की कळवा.
तुम्हाला हे मराठी म्हणी आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांना तसेच सोशल मीडियावर नक्की share करा.

Leave a Comment